Thursday 31 May 2012



म्हणे " सत्यमेव जयते " 

अमिर खान चा हा कार्यक्रम बघून सर्व राज्यातले मुख्य मंत्र्यांनी अवाच्चपणे उदगार काढले. अमिर च्या या " सत्यमेव जयते " या कार्यक्रमातील मुख्य विषयाला " स्त्रीभ्रूण हत्या" विषयावर फक्त बोलला आणि भारत भर भरभरून प्रतिसाद दिला.

मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्री "पृथ्वीराज चव्हाण" उर्फ बाबा यांनी सुद्धा अमिरला आपल्या घरी बोलावणे केलेलं आहे.
" स्त्रीभ्रूण हत्या " हा विषय म्हणजे आत्ता डोके वर काढू लागला आहे.

पण आपल्या या महाराष्ट्रात ३५० वर्षापूर्वी " परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज " हे सुद्धा येऊन गेले खंर तर महाराजांच्या अंगी जे अलौकिक गुण होते. त्याचा विसर आपल्या हिंदू जणांना आणि मराठी माणसाला पडू लागला आहे.

आता " सत्यमेव जयते " आवडू लागले आहे. अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला आपल्या राजांच्या पवित्र "शिवचरित्र" मध्ये सुद्धा अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहे.

१) कल्याणच्या सुभेदाराची सुनेच तिच्या कुंकू राखून साडी चोळी मध्ये तिचा पाहूनचार केला आणि प्रत्यक्ष तिला " आई " चा दर्जा देऊन तिला परत पाठविले.

२) महापराक्रमी श्री शहाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर थोर जिजाऊ आपल्या काही नास्तिक प्रथा पाळणार होत्या ते म्हणजे " सती " जाण्याचा ते सुद्धा महाराजांनी हि प्रथा बंद केली.

३) नालायक आणि कपटी औरंग्याच्या काळात कित्येक आई बहिंची इज्जत लुटत असे तर त्यांना माणसांना " देह दंड " दिल्या शिवाय महाराज अन्न सुद्धा ग्रहण करत नव्हते.

अश्या अनेक गोष्टी घडून गेल्या आहे पण त्याचा विसर आपल्या राजकारण्यानां आणि मुख्य म्हणजे आपल्या हिंदू आणि मराठी माणसाला .............

जर आपण परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज आणि परम प्रतापी छत्रपती श्री शंभाजी महाराज यांचा आदर्श ठेवला तर आज आणि भविष्यात असे अपरिचित घडणार नाही ह्यात सुद्धा तथ्य आहे............

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
ll जय शंभू राजे ll
ll जय साई ll


" अन्न ग्रहण करण्यापूर्वी केला जाणारा मंत्र " 

यन्तु नदयो वर्षन्तु पर्जन्या: l
सुपिप्पला ओषधयो भवन्तु l
अन्नवता मोदनवतामामिक्षवताम् l 
एषा राजा भूयासम् l
ओदनमुद्ब्रुवते परमेष्टि वा एषा : यदोदन: l
परमामेवैनम् श्रियं गमयति l

(कृष्ण यजुर्वेद)

भावार्थ :- सर्व नद्या गतिमान होऊ दे, (पाण्याने प्रवाहित असे दे) नेहमी पाउस पडू दे.सर्व औषधी वनस्पती परिपूर्ण होऊ दे,
साध्या गवताच्या तृणापासून ते मोठमोठ्या झाडांना,
वेलीनां सर्वत्र फळे आणि फुले येऊ दे,
इतर धान्य गहू तांदूळ वैगरे ( दूध,दही,तूप आणि इतर गौ पदार्थ)
विकसित करणारे राष्ट्राचा मी पालकत्व बनू दे.
जेवणाच्या ताटात शिजवलेले अन्न भात (तांदूळ) स्वतः श्रेष्ठ रुपी ब्रम्ह आहे.
हे अन्न सेवन करणा-याला उच्चतम ऐश्वर्य आणि शारीरिक संपदा रुपी लक्ष्मी लाभू दे,


***************************************************

मा भ्राता भ्रातरं द्विक्षन् मा स्वसारमुत स्वसा
सम्यचः सव्रता भूत्वा वाचं वदत भद्रया

(अथर्ववेद)

भावार्थ :- भाऊ - भाऊंनी द्वेष न करता.
बहिणी - बहिणींनी भांडण न करता.
सर्वांनी एकत्र राहून एकतेचे व्रत अंगी स्वीकारून एकतेची बोली बोलावी.

************************************************

ॐ सहनाववतु l सहनौ भूनक्तु l सहवीर्य करवावहे l
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै l

ll ॐ शान्ति : शान्ति : शान्ति : ll

(कृष्ण यजुर्वेद उपनिषद)

अर्थ :- आपण दोघे ( गुरु आणि शिष्य ) परस्पर मिळून सुरक्षा करू.
आपण दोघांनी भोग करूया, (देशांत मध्ये कोणीही भूखेने व्याकूळ होऊ राहता कामा नये)
आपण दोघांनी मिळून शौर्य आणि पराक्रम करूया,(राष्ट्रां मध्ये युद्धजन्य परिस्तिथी आल्यावर युद्ध करू)
आपण (या देशाला संगठन रुपी तपश्चर्या करून) उज्वळ आणि प्रदीप करू,
आपले अध्ययन तेजस्वी करू,
परस्पर द्वेष न करता तो तीन गोष्टीन पासून (आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक) करून शांती प्रस्थापित कार्य करू,

ll ॐ शान्ति : शान्ति : शान्ति : ll

************************************************

(टीप: अन्न ग्रहण करण्यापूर्वी केला जाणारा हा मंत्र मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "एकात्मता - स्तोत्रम" या पुस्तकातून घेतलेले आहे.)

ll जय शिवराय ll
ll जय शंभूराजे ll
ll जय साई ll



येथे हिंदुस्तान आणि पाकिस्तान यांची नेहमी प्रमाणे राष्ट्रीय ध्वजाची मानवंदना देणे असे हा रोजचा खेळ आहे पण सत्य परिस्तिथी म्हणजे एकमेकांच्या विरोधात आपण किती आहोत हे दाखवावे लागते.
त्या दिवशी आमचे सहपरिवार अमृतसर येथील " सुवर्ण मंदिर " पाहून पुढील कार्यक्रम हा हिंदुस्तान आणि पाकिस्तान यांची संध्याकालची राष्ट्रध्वजाची मानवंदना याचा कार्यक्रम पाहण्यास गेलो होतो. आमच्या सर्व परिवाराची चुकामुक झाली.पण तो पर्यंत तेथील BSF ( सीमा सुरक्षा जवान ) यांनी शांत बसण्यास सांगितले. थोड्या वेळात मानवंदना कार्यक्रम सुरु होणार त्या आधी आपला राष्ट्रीय ध्वज '' तिरंगा " घेऊन काही लहान मुलांना त्या पथावरून आनंदाने आणि जल्लोषाने नाचत आपला तिरंगा खाली न पडता धावत जाण्यास सांगितले.
आमच्या परिवारातील काही लहान मुलांनी आपला राष्ट्रीय ध्वज नाचत आणि आनंदाने न पडता नेला तो सुद्धा पाकिस्तानच्या सीमा रेषा जवळून त्या नंतर तेथील एक सीमा अधिका-याने ध्वनी उत्सर्जित संचावरून बसलेल्या सर्व हिंदुस्तानी नागरिकांना एक आवाहन केले कि , फक्त ३ घोषण मर्यादित आहे.
१. वंदे मातरम्
२. भारत माता कि जय
३. हिंदुस्तान झिंदाबाद

या शिवाय कोणत्याही घोषण देऊ नये असे सक्त ताकीद सुद्धा केली होती. त्या प्रमाणे आपल्या नागरिकांनी त्या सूचनांना दाद सुद्धा दिली. त्या नंतर सर्व कार्यक्रम त्यांच्या पाकिस्तानी घोषणांनी आणि आपल्या हिंदुस्तानी घोषणांनी झाला. हा कार्यक्रम ६.३० वाजता संपूर्ण झाला त्या नंतर आपले हिंदुस्तानी नागरिक पण त्या दिव्य भवनातून बाहेर पडले. पण त्या आधी काही जणांनी प्लास्टिकचे " तिरंगा " घेतले होते. आणि ते जाताना घाई गडबडीत पडून गेले.
तेव्हा आम्ही तेथून जात असताना ते सर्व प्लास्टिकचे ध्वज पडलेले होते तेव्हा मी आणि माझ्या आई ने ध्वज उचलून माझ्याकडे दिले.तेव्हा मी ते सर्व ध्वज BSF ( सीमा सुरक्षा जवान ) आणि स्थानीय सीमा सुरक्षा पोलीस यांच्या कडे गेलो आणि एक प्रश्न उपस्तिथ केला तो पण हिंदी मधून

" सरजी ये तो अपनी हिंदुस्तान कि शान ओर जान है l इस के लिए तो नजाने कितनोने अपनी जान की बाजी लगा दी और आप यहा पे तैनात होके भी अपने इस हिंदुस्तान की शान का क्यों निचा दिखा रहे हो ........? "
त्या वर दिलेले मला उत्तर
" इस में हम क्या करे ..........? "
मी तर माझ्या आई बरोबर ते प्लास्टिकचे ध्वज उचलून बाहेरचा रस्ता पकडला आणि जाताना त्या प्लास्टिकचे ध्वज विकणारे त्यांना सुद्धा मनातून सुद्धा शिव्या घातल्या.
त्यामुळे ते पडलेले आपले राष्ट्रीयध्वज मी ते उचलून आमच्या राहत्या हॉटेल जवळ ठेवेले.




सेर सिवराज है


इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१||
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||
दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||

-कविराज भूषण


भावार्थ :
जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चीत्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करता


मुद्रणभाषा : ॐकार नेरलेकर



चारि चारिचौकी जहाँ चकत्ताकी चहूं और, 
साँज अरु भोर लगी रही जिय लेवा की ।


कँधे धरी कांवर, चल्यो जब चाँवसे, 
एकलिए एक जात जात चले देवा की ।


भेंस को उतारी डार्‍यो डम्बर निवारी डार्‍यो,
धर्यों भेंस और जब चल्यो साथ मेवा की ।


पौन हो की पंछी हो कि गुटखान कि गौन हो,
देखो कौन भाँति गयो करामात सेवा की ॥


अर्थ -
चारी बाजूला या चुग़ताई वंशाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या प्राणघातक चौक्या दिवसरात्र वाढू लागलेल्या आहेत. कावड खांद्यावर घेऊन एक एक जण मोठ्या डौलाने, अत्यंत आरामात देवाकडे निघालेले आहेत. अशा वेळी त्यांनी (शिवाजी महाराजांनी) आपला वेष उतरवला, अवडंबर (जे आजारपणाचे सोंग माजवलं होतं ते) टाळलं, वेष बदलला आणि मेवा मिठाईच्या त्या पेटार्‍याबरोबर ते निघाले आणि पळून गेले. शिवाजी महाराजांची ही करामत बघून (आग्र्याचे) लोक थक्क झाले. त्यांना कळेना की ते (शिवाजी महाराज) वार्‍याच्या झुळकीसारखे गेले की पक्ष्यासारखे उडून गेले की गुटखा खाऊन एकदम गुप्त झाले. शिवरायांच्या या करामतीला काय म्हणावे हे कोणांस कळेनासे झाले !



ll जय शिवराय ll  

ll जय शिवसाई ll  

मुद्रणभाषा : ॐकार नेरलेकर


छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गडकिल्ले यांच्याबद्दल असलेली माझी श्रद्धा आणि विश्वास 

मी पहिला गड बघितला तो हा " पुरंदर " पण दुसरा गड हा " लोहगड" पण सर्व गड किल्ले आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हे सगळ्यांना माहित आहे पण सह्याद्री प्रतिष्टान चे प्रमुख थोर शिवभक्त 
" श्री श्रमिक गोजमगुंडे " आणि दुर्गवीर प्रतिष्टान चे प्रमुख थोर शिवभक्त " संतोष हसुरकर " हे सध्या गडकिल्ले यांच्या बद्दलची माहिती  सर्व शिवप्रेमिनां देत आहे.
पण माझी खरी सुरवात झाली ती लोहगडा पासून सर्वजण बोलतात कि, निर्जीव वास्तू काय देणार आपल्याला ..........? त्याचा फक्त वापर तर होत असतो पण आपण नीट लक्ष सुद्धा नाही देत. असंच एक गोष्ट माझ्या आयुष्यात घडली तीपण संतोष हसुरकर यांच्याबरोबर मी केलेल्या प्रथमचं गडाच्या श्रमदानाच्या पहिल्या भेटीत तीपण मारुतीच्या मंदिरात रात्री संतोष दादा त्या रात्री आमच्या बरोबर गप्पा गोष्टी करत असताना संतोष दादा ने सुद्धा हेच सांगितले कि, जर आपण आपल्या राजांच्या गडांना प्रेम आणि आपुलकी दिली तर ते सुद्धा आपल्याला तितकेच भरभरून प्रेम देतील. हे वाक्य माझ्या मेंदूत गेले ५ ते १० दिवस रेंगाळत होते.

मी आणि आमच्या " गडवाट " वरील मुख्य व्यवस्थापक " राहुल बुलबुले " व सर्व मावळे लोहगडाच्या साफसफाई साठी एकत्र लोहगडावर आलो आणि ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व जण गडांच्या साफ सफाई साठी गडावर स्वारी करायला सुरवात केली आणि तसेच सगळे काम सुद्धा ठरल्याप्रमाणे पूर्ण केले. खरी सुरवात आता होत आहे. संध्याकाळी आम्ही सर्व जण त्या दिवशी श्रमदान केल्यावर परतीच्या वाटेवर जात असताना. दोन गोष्टी घडल्या आमचे बंधू शिवभक्त " आबासाहेब कापसे " आणि '' जितेंद्र ताम्हाणे " यांना सुद्धा याची जाणीव झालेली असेल. आबासाहेब कापसे या बंधूंच्या दुचाकी वाहनाची घरी येत असताना वाटेत म्हणजे अगदी पनवेल जवळ आल्यावर त्यांची दुचाकी वाहनाची साखळी तुटली तीपण प्रमुख मार्गावर आणि जितेंद्र या बंधूंची दुचाकी बंद पडली पण ती त्या नंतरच्या दुस-या दिवशी या दोन्ही गोष्टींचा नीट जर विचार केला तर ते आमचे दुचाकी वाहन जर लोणावळ्या जवळ घाटात आड रानाला झाले असते तर आम्हाला चौघांना त्या रात्री तेथेच काढावी लागली असती. पण आमच्या राजांचे गडकिल्ले यांना आणि साक्षात आमच्या राजांच्या मनात नव्हते असे वाटते.
तात्पर्य एकचं जर राजांच्या गडांना जर आपण प्रेम दिले तर ते गडकिल्ले सुद्धा नक्की आपल्याला सुद्धा तितकेच प्रेम देतील.

(टीप : मला येथे कोणत्याही शिवभक्ताला बद्दल मोठेपण नाही दर्शवत आहे कारण, ज्या राजांनी आपल्या हिंदु धर्माबद्दल जी आहुती दिली आहे त्या महाराजांनबद्दल आणि त्यांच्या गडकिल्ले थोडा अनुभव लिहित आहे.)

ll जय जिजाऊ ll 
ll जय शिवराय ll 
ll जय शंभूराजे ll 
ll  जय शिवसाई ll

ll जयतु हिंदूराष्ट्र भवः ll




ll ॐ श्री नथूरामाय नमः ll

नथुराम गोडसे यांचा जन्म १९ मे १९१० रोजी बारामती येथे झाला.हा इतिहासातील सुवर्ण क्षण आहे. 

"नथूराम विनायक गोडसे" यांचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट ऑफिस चे कर्मचारी होते आणि आई लक्ष्मी गोडसे एक गृहिणी होती ,यांचे जन्म नाव रामचंद्र गोडसे होते यांचा आधी विनायक गोडसे यांचे ३ अपत्य अल्पवयात च मृत्यू पावले फक्त एक मुलगीच जिवंत राहिली होती त्या मुळे यांचा आई वडिलांनी 
देवी कडे प्रार्थना केली होती कि आता जर मुलगा झाला तर त्याचे संगोपन मुली प्रमाणे करू या मान्यते मुळे लहान पणी यांचा नाकात नथ घातली जायची आणि या मुळे हे नाथुराम विनायक गोडसे असे होते पण पुढे " नथुराम विनायक गोडसे " या नावाने प्रसिध्द झाले .

पण मुळात नथुराम यांचा प्रथमदर्शी उल्लेख हा " गांधी - हत्या " असा होतो. मुळात " गांधी - हत्या " असा उल्लेखच मुळात चुकीचा आहे.
" गांधी - वध " हा शब्द तंतोतंत साधर्म्य करणारा आहे.

"हत्या आणि वध" याचा प्रथमदर्शी मुळ हेतू बघितला तर हत्या या शब्दाचा अर्थ हा वैयक्तिक कारणामुळे होतो. म्हणजे फक्त स्वहितासाठी फक्त आणि फक्त स्वतःच्या हितासाठी दुस-या मनुष्याची हत्या करणे असा होतो.

"वध" या शब्दाचा अर्थ स्वहित न जपता दुस-याच्या आणि धर्माच्या हितासाठी केलेले कार्य म्हणजे "वध"..............

जे श्री कृष्णाने त्यांच्या मामाचा कंस याचा "वध" केला हत्या नाही........

जे अर्जुनाने त्याच्या चुलत भावांचा महाभारतात "वध" केला हत्या नाही ..........

जे चाफेकर बंधू यांनी रँड या कमीश्नर चा "वध" केला हत्या नाही ...........

जे अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी न्या. जॅक्सन चा "वध" केला हत्या नाही .........

जे उधमसिंह यांनी मायकल ओडवायर याचा "वध" केला हत्या नाही ..........

जे मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा "वध" केला हत्या नाही ........

जे भगतसिंग आणि राजगुरु यांनी सॉडर्सचा "वध" केला हत्या नाही .........

जे शांती घोष - सुनीती चौधरी यांनी कोमिल्लाच्या जिल्हा ब्रिटीश अधिकारी याचा "वध" केला हत्या नाही ..........

पण "नथूराम गोडसे" यांनी ज्या भारतमातेचे विभाजीकरण ज्या महात्मा गांधी व्यक्तीमुळे झाले अश्या व्यक्तीचा "वध" केला हत्या नाही .........

अश्या त्या भारत मातेच्या पुत्राला मनोमन शतशा: वंदन

ll जय शिवराय ll
ll वंदे मातरम् ll

Wednesday 30 May 2012





ll ॐ श्री गडकोटाय नमः ll 

हिंदू धर्मांचे दोन प्रमुख शिलेदार : - 

१) हिंदू साधू संत आणि २) धर्मवीर योद्धे 

१) हिंदू साधू संत :-

ज्यांनी हिंदू धर्म प्रचार आणि प्रसार आपापल्या परीने केला. ते म्हणजे ज्ञानेश्वर माउली, सोपानकाका, श्रीपाद वल्लभ महाराज, नृसिंह सरस्वती महाराज, अक्कलकोट दिगंबर स्वामी समर्थ, शिर्डी साई ईश्वर साईबाबा, हुमनाबादचे माणिक प्रभू महाराज आणि टेंभे स्वामी महाराज या पुरुषांना ज्या देवाचा साक्षातकार झाला.त्यांनी हिंदू धर्माची दिशा आणि प्रचार अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे नेला.
आज त्यांचेच भक्त मंडळी त्यांची आश्रय स्थाने यांना देवळाचे आता स्वरूप देण्यात आले. लाखो आणि करोडो रुपयांनी देणगी येत आहे. पण ज्या वीर योध्यांनी आपला हिंदू धर्म वाचवला त्यांची दुर्ग मंदिराना आपण आज नाकारत आहे बरोबर ना ........

२) धर्मवीर योद्धे : -

परम प्रतापी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र परम प्रतापी छत्रपती श्री शंभाजी महाराज यांनी जर त्या काळात मुघलशाही, निजामशाही,कुतुबशाही आणि इंग्रज यांच्या सारख्या हिंदू नास्तिकांना जर वेळीच रोखले नसते तर आज आपण सुद्धा भलताच देव मानत असतो. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र श्री शंभाजी महाराज यांच्या शूरवीर, मुसद्दी आणि कठोर पावले उचलणारे महाराज यांच्या दुर्ग मंदिराना आज आपण नाकारत आहोत. याची स्पष्ट योक्ती सर्व गडकिल्ले देत आहे.

पण आज त्या परम प्रतापी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभाजी महाराज यांनी जी दुर्ग मंदिरे त्या काळात उभारली होती. त्यांची अवस्था अक्षरशा: मोडकळीस आलेली आहे.त्यांची हि दुरावस्था गेले ३५० वर्षे नाही त्याहून अधिक काळ बघत आलेलो आहे.

त्या दुर्ग मंदिरांची पुनर्बांधणी आता करणे या नालायक सरकारला शक्य नाही यांना फक्त महाराजांच्या नावरून जातीभेद आणि मतदान कसे मिळवायचे हे माहित आहे. पण अश्याच विचारांना विरोध करणारा आणि दुर्ग मंदिरांची साफसफाई आणि थोड्या फार प्रमाणात पुनर्बांधणी विचार सर्व शिवभक्तांच्या मनात हा गड किल्यांचा विषय आणून देणारी प्रतिष्ठान स्थापित झाले. ते म्हणजे " दुर्गवीर प्रतिष्ठान " हे प्रतिष्ठान गेले ५ वर्षापासून हे काम करत आहे. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता. " दुर्गवीर प्रतिष्ठान " चे अध्यक्ष कु. संतोष हसुरकर उर्फ " संतोष दा " आणि इतर हुशार मावळे शैलेश कंधारे, नितीन पाटोळे, अनिकेत तमुचे, विवेकानंद दळवी, देवेश सावंत, नरेश दादा आणि नितीन सक्रे इतर शिवभक्तांनी हे यांनी हे संकल्प आपण सर्व शिवभक्तां समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.

गेले ५ वर्षे हिंदवी स्वराज्याच्या संरक्षण तटबंदीत असलेले गडांना पुन्हा नाविन्यपुर्ण इतिहास देण्याचे कार्य " दुर्गवीर प्रतिष्ठान " करत आहे. मानगड, सुरगड आणि आता अवचितगड या सारख्या दुर्ग मंदिरांना " दुर्गवीर प्रतिष्ठान " चे मावळे श्रमदान या योजनेतून साकारत आहे.

मग आपण का म्हणून मागे राहायचे छत्रपती श्री शिवाजी महाराज फक्त टी-शर्ट, दुचाकी वाहनावर आणि मनात नको तर प्रत्यक्ष कार्यात आणा मगच तो शिवभक्त समजला जाईल.

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
ll जय शंभूराजे ll
ll जय शिवसाई ll

ll अखंड हिंदूराष्ट्र भवः ll