Tuesday 19 June 2012

दुर्गवीर प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी "किल्ले मानगड" श्रमदान मोहीम राबविली.












१७/०६/२०१२ या राजमाता जिजाऊ पुण्यदिन निमित्त "दुर्गवीर प्रतिष्ठान" च्या वतीने राबविण्यात आलले दुर्ग संवर्धन मोहिमे अंतर्गत "किल्ले मानगड" वरील मुख्य प्रवेशदरवाजातील मांडणी आणि एका जुन्या दरवाजातील उत्खनन श्रमदान राबविण्यात आलेले आहे.

ज्या मानगडाची साफ - सफाई न करण्यात आल्याने "किल्ले मानगड'' ठिकठिकाणी अस्वच्छता झाली होती. ती सुद्धा दुर्गवीरच्या कार्यकर्त्यांनी साफ सफाई करण्यात आली. मुख्य म्हणजे मानगडाच्या शेवटच्या बुरुजावरील २५० ते ३०० वर्षापूर्वीचा दरवाजा सुद्धा उत्खनन करून तो संपूर्णपणे ६ ते ७ शिवकाळातील पायऱ्या दिसतील अश्या अवस्थेत ते श्रमदान करण्यात आले.

त्या दरवाजावरील मातीचा ढिगारा आणि दगड काढण्यात आले. या पुढे त्या गडाला भेट देणाऱ्या शिवभक्तांना त्या शिवकाळातील तो दरवाजा आता संपूर्णपणे बघू शकतो अश्या पद्धतीने श्रमदान करण्यात आले.

दुर्गवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष कु. संतोष हसुरकर, संपर्कप्रमुख - श्री. अजित राणे आणि सहसंपर्क प्रमुख - कु. नितीन पाटोळे आणि मुख्य म्हणजे ६ तरुणी आणि ३६ तरुण असा दुर्गवीर परिवारातील मावळ्यांनी हे श्रमदानाचे संयोजन राबविण्यात आले.

गडाच्या पायथ्याशी असलेले मानवाडी उर्फ (माशिदवाडी) येथील ग्रामस्थ "रामजी कदम" यांनी सुद्धा दुर्गवीरच्या सर्व मावळ्यांना आपल्या परिवारातील एक घटक समजून जी मदत केली ती त्या मदतीला शब्द सुद्धा कमी पडतील असे आहे.

(सोबत)- श्रमदाना सोबत गडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यात गरीब मूलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. सदर मोहिमेत मुंबई सोबत पुण्याच्या दुर्गवीरांनी सुद्धा विशेष मेहनत घेतली.

सेवे ठायी तत्पर ...दुर्गवीर निरंतर ...

दुर्गवीर प्रतिष्ठान
एक छोटासा कार्यकर्ता

(चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे)

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
ll जय शंभूराजे ll

ll अखंड हिंदूराष्ट्र भवः ll
 

Saturday 9 June 2012



।। स्वस्ति श्री ।।

शिवकार्य असे ही

दुर्गवीर प्रतिष्टान श्रमदानासहीत सामाजिक बांधिलकीचे कार्य करत आहे.हीच बांधिलकी जपण्यासाठी शिवदुर्ग सुरगड़ (नागोठणे) येथील पाडयातील विद्यार्ध्यानां शालेय वस्तूंचे साहित्य संच देण्यात येणार आहे....

प्रत्येक विद्यार्थीस शालेय वस्तूंचे साहित्य संच खालील प्रमाणे वस्तु देण्यात येणार आहे......

१) दप्तर २) मोठी वही ९ नग
३) पेन्सिल संच ४) रंगीत खडू (चित्रकला)
५) कंपास पेटी

या सोबत छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ साहेब व शंभुराराजांच्या जीवनावरील पुस्तके भेट देण्याचा सुद्धा मानस आहे.

ज्या शिवभक्तांना पुस्तके भेट द्यावयाचे आहेत ,परंतु प्रत्यक्ष मोहीमेला उपस्थित राहता येणार नाही. त्यांनी लवकारात लवकर संपर्क साधावा.

सदर मोहिमेस आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.

शिवकृपेने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने या शिवकार्यात यश लाभेल हे निश्चितच.

सर्व शिवशंभू भक्तांनी (दिवा) स्थानका येथे १० जून २०१२ रोजी सकाळी ठीक ६.०० वाजता जमावे.

शालेय वस्तुचे वाटप करुन झाल्यावर ,सुरगडाचे(गडदर्शन) दर्शन घेवुन दुपार पर्यत मोहिमेची सांगता घेवुया .

आणिक म्हणे उचलु वाटा खारीचा,
तोला नि मोलाचा,
मनात ध्यास शिवबाचा,
अन शिवबाच्या कार्याचा.

आमचे संपर्क :
नि३ पाटोळे ८६५५८२३७४८
अजित राणे ९७६८३८९१८९


ll जय शिवराय ll
ll जय शिवसाई ll

छत्रपती शिवराय - एक थोर वनस्पती शास्त्रज्ञ 

"किल्ले रायगड"  हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूटउंचीवर आहेमराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे.
छत्रपती शिवरायांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६  व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली.शिवरायांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झालागडावर पोहोचायला
जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत.
किल्ले रायगड ह्या गडावर चढत असताना आपल्याला डाव्या बाजूला ऐनआंबाआपटाआसनाबोंडाराहिरडाकरंजमोहानानापायरसागसातीन, औदुंबर (उंबर), शिंदी याशिवाय अनेक महत्त्वाच्या वनस्पतीही आढळतात.

 रायगडातील वनांतून उपलब्ध होणाऱ्या वनौषधींच्या जोरावर आज कोटय़वधी रुपयांचा नफा कमावणाऱ्या देशी  परदेशी औषध कंपन्या मोठय़ा प्रमाणात जन्मास आल्यापरंतु ही अनन्यसाधारण औषधी वनसंपदा ज्या रायगड जिल्ह्याच्या वन विभागाच्या ताब्यात आहेत्या रायगड जिल्ह्याच्या वन विभागाचे या औषधी वनौषधींच्या वार्षिक लिलावातून मिळणारे वार्षिक उत्पन्न केवळ ३५ लाख ५० हजार ७३५ रुपयांचे आहे.
हे उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढण्याजोगे असतानाहीत्याबाबतचा विचार वन विभागाला अद्याप शिवलेला नाहीयाचा सरकारला गांभीर्याने विचार करावा लागणार आहेयात शंका नाही

पण
 आपले छत्रपती शिवराय हे सुद्धा वनस्पतींचे प्रकार जाणकार होतेवरील दिलेल्या झाडांपैकी औदुंबर (उंबरया झाडाची विशेष काळजी घेतली जायची.

कारण .......................

 "
जेथे औदुंबराचे स्थान , तेथे पाण्याला मान " 
ह्या
 वाक्याला आपले शिवराय चांगले जाणकार होतेउंबराच्या झाडाजवळ जमिनीखाली पाणी खोलवर मुरलेले असते, असे म्हणतात.म्हणून  समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूटउंचीवर असून या गडावर पाण्याची कमतरता भासत नाही.याचे उत्तम प्रकारे औदुंबर (उंबरहे वृक्ष औषधी वनस्पती मध्ये गणले जाते

किल्ले रायगडावर शिवराय असताना अनेक लढाया झाल्या होत्या पण त्या वेळेला कित्येक मावळ्यांना अनेक इजा होत असे पण रायगडावर अश्या अनेक औषधी वनस्पती होत्या कि त्यांचे निवारण लगेच होत असेअन मावळ्यांना सुद्धा आराम मिळत असे

औदुंबर (उंबरवृक्षाची वैशिष्ठे :- 
उंबराची साल, फळ, चीक, रस, पाने यांचा औषधात वापर करतात.उंबर हे पित्तशामक, तसेच तहान भागविणारे आहेआम्लपित्तावर उंबराची पिकलेली फळे साखरेबरोबर देतात.उष्णतेने अंगाची आग होत असल्यास सालीचे चूर्ण किंवा काढ्याचा उपयोग होतो. रक्तपित्त नावाच्या आजारात याचा चांगला उपयोग होतो.सारखे जुलाब होत असल्यास उंबराचा चीक साखरेतून खावा. लहान मुलांच्या गोवर, कांजिण्या यामध्ये होणाऱ्या उष्णतेवर उंबराचा रस किंवा सालीचे चूर्ण मधातून चाटवावे. मुलांच्या नाकातून घोळाणा फुटणे यावर फळांचा उपयोग होतो. खूप भूक लागणे, कितीही खाल्ले तरीही समाधान  होणे, सारखी खा खा सुटणे, या भस्मक रोगावर सालीचे चूर्ण किंवा मुळाचे पाणी द्यावे. जुन्या उंबराचे मूळ कापून त्याखाली भांडे ठेवावे, म्हणजे त्यामध्ये मुळाचे पाणी साठेल. हे पाणी अतिशय थंड असते. उंबरापासून उदुंबरावलेह करतात, तो ही थंड आहेहे औदुंबरजल जर प्राशन केले तर मुत्रखडा आणि इतर      
 व्याधींतून सुद्धा मुक्तता मिळते हे खरे आहे

महाराजांनी फक्त स्वतः पुरते मर्यादित न ठेवता आपल्या लाडक्या प्रजेला सुद्धा कधी काळी त्रास झाला तर ह्या गोष्टींची आपुर्ता जरूर करावी हे सतत सांगत असे.


रामचंद्र पंत अमात्य असे राजआज्ञा नुसार नमूद करून गेले कि,
गडावर शेकडो - हजारो लोकांचे वास्तव्य असून देखील तेथे अन्नधान्यसाठी शेती करती नसत. पण गडावर भाजीपाल्याची लागवड कशी करावी ....? आणि गडावरची झाडी कशी राखावी याबद्दल आज्ञापत्रात लिहीले गेले आहे कि, "गडावरी मार्गामार्गावरील बाजारात तटोतट केर कसपट किमपि पडो दयावे. ताकीद करून झाला केर गडाखाली टाकिता जागोजागी जाळून ती राख परसात टाकून घरोघरी होईल ते भाजीपाले करावे."
 गडावरील झाडे जी असतील ती राखावी. याविरहीत जी जी झाडे आहेत ती फणस, आंबे, चिंचा, वड, पिंपळ आदीकरून थोर वृक्षे, निंबे, नारिंगे आदीकरून लहान वृक्ष तसेच पुष्पवुक्ष, वल्ली किंबहुना प्रयोजक - अप्रयोजक जे झाडे होत असेल ते गडावर लावावे. जतन करावे. समयी तितकेही लाकडाचे तरी प्रयोजनास येतील. अमात्यांच्या आज्ञापत्रातील ही "वृक्षसंवर्धननीती" खरोखर वाखाणण्या सारखी आहे.    

अश्या त्या परम प्रतापी छत्रपती शिवरायांना मनापासून मनाचा मुजरा ..........

ll जय शिवराय ll
ll जय शिवसाई ll