Thursday, 31 May 2012



छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गडकिल्ले यांच्याबद्दल असलेली माझी श्रद्धा आणि विश्वास 

मी पहिला गड बघितला तो हा " पुरंदर " पण दुसरा गड हा " लोहगड" पण सर्व गड किल्ले आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हे सगळ्यांना माहित आहे पण सह्याद्री प्रतिष्टान चे प्रमुख थोर शिवभक्त 
" श्री श्रमिक गोजमगुंडे " आणि दुर्गवीर प्रतिष्टान चे प्रमुख थोर शिवभक्त " संतोष हसुरकर " हे सध्या गडकिल्ले यांच्या बद्दलची माहिती  सर्व शिवप्रेमिनां देत आहे.
पण माझी खरी सुरवात झाली ती लोहगडा पासून सर्वजण बोलतात कि, निर्जीव वास्तू काय देणार आपल्याला ..........? त्याचा फक्त वापर तर होत असतो पण आपण नीट लक्ष सुद्धा नाही देत. असंच एक गोष्ट माझ्या आयुष्यात घडली तीपण संतोष हसुरकर यांच्याबरोबर मी केलेल्या प्रथमचं गडाच्या श्रमदानाच्या पहिल्या भेटीत तीपण मारुतीच्या मंदिरात रात्री संतोष दादा त्या रात्री आमच्या बरोबर गप्पा गोष्टी करत असताना संतोष दादा ने सुद्धा हेच सांगितले कि, जर आपण आपल्या राजांच्या गडांना प्रेम आणि आपुलकी दिली तर ते सुद्धा आपल्याला तितकेच भरभरून प्रेम देतील. हे वाक्य माझ्या मेंदूत गेले ५ ते १० दिवस रेंगाळत होते.

मी आणि आमच्या " गडवाट " वरील मुख्य व्यवस्थापक " राहुल बुलबुले " व सर्व मावळे लोहगडाच्या साफसफाई साठी एकत्र लोहगडावर आलो आणि ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व जण गडांच्या साफ सफाई साठी गडावर स्वारी करायला सुरवात केली आणि तसेच सगळे काम सुद्धा ठरल्याप्रमाणे पूर्ण केले. खरी सुरवात आता होत आहे. संध्याकाळी आम्ही सर्व जण त्या दिवशी श्रमदान केल्यावर परतीच्या वाटेवर जात असताना. दोन गोष्टी घडल्या आमचे बंधू शिवभक्त " आबासाहेब कापसे " आणि '' जितेंद्र ताम्हाणे " यांना सुद्धा याची जाणीव झालेली असेल. आबासाहेब कापसे या बंधूंच्या दुचाकी वाहनाची घरी येत असताना वाटेत म्हणजे अगदी पनवेल जवळ आल्यावर त्यांची दुचाकी वाहनाची साखळी तुटली तीपण प्रमुख मार्गावर आणि जितेंद्र या बंधूंची दुचाकी बंद पडली पण ती त्या नंतरच्या दुस-या दिवशी या दोन्ही गोष्टींचा नीट जर विचार केला तर ते आमचे दुचाकी वाहन जर लोणावळ्या जवळ घाटात आड रानाला झाले असते तर आम्हाला चौघांना त्या रात्री तेथेच काढावी लागली असती. पण आमच्या राजांचे गडकिल्ले यांना आणि साक्षात आमच्या राजांच्या मनात नव्हते असे वाटते.
तात्पर्य एकचं जर राजांच्या गडांना जर आपण प्रेम दिले तर ते गडकिल्ले सुद्धा नक्की आपल्याला सुद्धा तितकेच प्रेम देतील.

(टीप : मला येथे कोणत्याही शिवभक्ताला बद्दल मोठेपण नाही दर्शवत आहे कारण, ज्या राजांनी आपल्या हिंदु धर्माबद्दल जी आहुती दिली आहे त्या महाराजांनबद्दल आणि त्यांच्या गडकिल्ले थोडा अनुभव लिहित आहे.)

ll जय जिजाऊ ll 
ll जय शिवराय ll 
ll जय शंभूराजे ll 
ll  जय शिवसाई ll

ll जयतु हिंदूराष्ट्र भवः ll

No comments:

Post a Comment