Thursday, 31 May 2012



चारि चारिचौकी जहाँ चकत्ताकी चहूं और, 
साँज अरु भोर लगी रही जिय लेवा की ।


कँधे धरी कांवर, चल्यो जब चाँवसे, 
एकलिए एक जात जात चले देवा की ।


भेंस को उतारी डार्‍यो डम्बर निवारी डार्‍यो,
धर्यों भेंस और जब चल्यो साथ मेवा की ।


पौन हो की पंछी हो कि गुटखान कि गौन हो,
देखो कौन भाँति गयो करामात सेवा की ॥


अर्थ -
चारी बाजूला या चुग़ताई वंशाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या प्राणघातक चौक्या दिवसरात्र वाढू लागलेल्या आहेत. कावड खांद्यावर घेऊन एक एक जण मोठ्या डौलाने, अत्यंत आरामात देवाकडे निघालेले आहेत. अशा वेळी त्यांनी (शिवाजी महाराजांनी) आपला वेष उतरवला, अवडंबर (जे आजारपणाचे सोंग माजवलं होतं ते) टाळलं, वेष बदलला आणि मेवा मिठाईच्या त्या पेटार्‍याबरोबर ते निघाले आणि पळून गेले. शिवाजी महाराजांची ही करामत बघून (आग्र्याचे) लोक थक्क झाले. त्यांना कळेना की ते (शिवाजी महाराज) वार्‍याच्या झुळकीसारखे गेले की पक्ष्यासारखे उडून गेले की गुटखा खाऊन एकदम गुप्त झाले. शिवरायांच्या या करामतीला काय म्हणावे हे कोणांस कळेनासे झाले !



ll जय शिवराय ll  

ll जय शिवसाई ll  

मुद्रणभाषा : ॐकार नेरलेकर

No comments:

Post a Comment