Thursday, 31 May 2012



" अन्न ग्रहण करण्यापूर्वी केला जाणारा मंत्र " 

यन्तु नदयो वर्षन्तु पर्जन्या: l
सुपिप्पला ओषधयो भवन्तु l
अन्नवता मोदनवतामामिक्षवताम् l 
एषा राजा भूयासम् l
ओदनमुद्ब्रुवते परमेष्टि वा एषा : यदोदन: l
परमामेवैनम् श्रियं गमयति l

(कृष्ण यजुर्वेद)

भावार्थ :- सर्व नद्या गतिमान होऊ दे, (पाण्याने प्रवाहित असे दे) नेहमी पाउस पडू दे.सर्व औषधी वनस्पती परिपूर्ण होऊ दे,
साध्या गवताच्या तृणापासून ते मोठमोठ्या झाडांना,
वेलीनां सर्वत्र फळे आणि फुले येऊ दे,
इतर धान्य गहू तांदूळ वैगरे ( दूध,दही,तूप आणि इतर गौ पदार्थ)
विकसित करणारे राष्ट्राचा मी पालकत्व बनू दे.
जेवणाच्या ताटात शिजवलेले अन्न भात (तांदूळ) स्वतः श्रेष्ठ रुपी ब्रम्ह आहे.
हे अन्न सेवन करणा-याला उच्चतम ऐश्वर्य आणि शारीरिक संपदा रुपी लक्ष्मी लाभू दे,


***************************************************

मा भ्राता भ्रातरं द्विक्षन् मा स्वसारमुत स्वसा
सम्यचः सव्रता भूत्वा वाचं वदत भद्रया

(अथर्ववेद)

भावार्थ :- भाऊ - भाऊंनी द्वेष न करता.
बहिणी - बहिणींनी भांडण न करता.
सर्वांनी एकत्र राहून एकतेचे व्रत अंगी स्वीकारून एकतेची बोली बोलावी.

************************************************

ॐ सहनाववतु l सहनौ भूनक्तु l सहवीर्य करवावहे l
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै l

ll ॐ शान्ति : शान्ति : शान्ति : ll

(कृष्ण यजुर्वेद उपनिषद)

अर्थ :- आपण दोघे ( गुरु आणि शिष्य ) परस्पर मिळून सुरक्षा करू.
आपण दोघांनी भोग करूया, (देशांत मध्ये कोणीही भूखेने व्याकूळ होऊ राहता कामा नये)
आपण दोघांनी मिळून शौर्य आणि पराक्रम करूया,(राष्ट्रां मध्ये युद्धजन्य परिस्तिथी आल्यावर युद्ध करू)
आपण (या देशाला संगठन रुपी तपश्चर्या करून) उज्वळ आणि प्रदीप करू,
आपले अध्ययन तेजस्वी करू,
परस्पर द्वेष न करता तो तीन गोष्टीन पासून (आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक) करून शांती प्रस्थापित कार्य करू,

ll ॐ शान्ति : शान्ति : शान्ति : ll

************************************************

(टीप: अन्न ग्रहण करण्यापूर्वी केला जाणारा हा मंत्र मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "एकात्मता - स्तोत्रम" या पुस्तकातून घेतलेले आहे.)

ll जय शिवराय ll
ll जय शंभूराजे ll
ll जय साई ll

No comments:

Post a Comment