Wednesday, 30 May 2012





ll ॐ श्री गडकोटाय नमः ll 

हिंदू धर्मांचे दोन प्रमुख शिलेदार : - 

१) हिंदू साधू संत आणि २) धर्मवीर योद्धे 

१) हिंदू साधू संत :-

ज्यांनी हिंदू धर्म प्रचार आणि प्रसार आपापल्या परीने केला. ते म्हणजे ज्ञानेश्वर माउली, सोपानकाका, श्रीपाद वल्लभ महाराज, नृसिंह सरस्वती महाराज, अक्कलकोट दिगंबर स्वामी समर्थ, शिर्डी साई ईश्वर साईबाबा, हुमनाबादचे माणिक प्रभू महाराज आणि टेंभे स्वामी महाराज या पुरुषांना ज्या देवाचा साक्षातकार झाला.त्यांनी हिंदू धर्माची दिशा आणि प्रचार अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे नेला.
आज त्यांचेच भक्त मंडळी त्यांची आश्रय स्थाने यांना देवळाचे आता स्वरूप देण्यात आले. लाखो आणि करोडो रुपयांनी देणगी येत आहे. पण ज्या वीर योध्यांनी आपला हिंदू धर्म वाचवला त्यांची दुर्ग मंदिराना आपण आज नाकारत आहे बरोबर ना ........

२) धर्मवीर योद्धे : -

परम प्रतापी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र परम प्रतापी छत्रपती श्री शंभाजी महाराज यांनी जर त्या काळात मुघलशाही, निजामशाही,कुतुबशाही आणि इंग्रज यांच्या सारख्या हिंदू नास्तिकांना जर वेळीच रोखले नसते तर आज आपण सुद्धा भलताच देव मानत असतो. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र श्री शंभाजी महाराज यांच्या शूरवीर, मुसद्दी आणि कठोर पावले उचलणारे महाराज यांच्या दुर्ग मंदिराना आज आपण नाकारत आहोत. याची स्पष्ट योक्ती सर्व गडकिल्ले देत आहे.

पण आज त्या परम प्रतापी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभाजी महाराज यांनी जी दुर्ग मंदिरे त्या काळात उभारली होती. त्यांची अवस्था अक्षरशा: मोडकळीस आलेली आहे.त्यांची हि दुरावस्था गेले ३५० वर्षे नाही त्याहून अधिक काळ बघत आलेलो आहे.

त्या दुर्ग मंदिरांची पुनर्बांधणी आता करणे या नालायक सरकारला शक्य नाही यांना फक्त महाराजांच्या नावरून जातीभेद आणि मतदान कसे मिळवायचे हे माहित आहे. पण अश्याच विचारांना विरोध करणारा आणि दुर्ग मंदिरांची साफसफाई आणि थोड्या फार प्रमाणात पुनर्बांधणी विचार सर्व शिवभक्तांच्या मनात हा गड किल्यांचा विषय आणून देणारी प्रतिष्ठान स्थापित झाले. ते म्हणजे " दुर्गवीर प्रतिष्ठान " हे प्रतिष्ठान गेले ५ वर्षापासून हे काम करत आहे. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता. " दुर्गवीर प्रतिष्ठान " चे अध्यक्ष कु. संतोष हसुरकर उर्फ " संतोष दा " आणि इतर हुशार मावळे शैलेश कंधारे, नितीन पाटोळे, अनिकेत तमुचे, विवेकानंद दळवी, देवेश सावंत, नरेश दादा आणि नितीन सक्रे इतर शिवभक्तांनी हे यांनी हे संकल्प आपण सर्व शिवभक्तां समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.

गेले ५ वर्षे हिंदवी स्वराज्याच्या संरक्षण तटबंदीत असलेले गडांना पुन्हा नाविन्यपुर्ण इतिहास देण्याचे कार्य " दुर्गवीर प्रतिष्ठान " करत आहे. मानगड, सुरगड आणि आता अवचितगड या सारख्या दुर्ग मंदिरांना " दुर्गवीर प्रतिष्ठान " चे मावळे श्रमदान या योजनेतून साकारत आहे.

मग आपण का म्हणून मागे राहायचे छत्रपती श्री शिवाजी महाराज फक्त टी-शर्ट, दुचाकी वाहनावर आणि मनात नको तर प्रत्यक्ष कार्यात आणा मगच तो शिवभक्त समजला जाईल.

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
ll जय शंभूराजे ll
ll जय शिवसाई ll

ll अखंड हिंदूराष्ट्र भवः ll

No comments:

Post a Comment