येथे हिंदुस्तान आणि पाकिस्तान यांची नेहमी प्रमाणे राष्ट्रीय ध्वजाची मानवंदना देणे असे हा रोजचा खेळ आहे पण सत्य परिस्तिथी म्हणजे एकमेकांच्या विरोधात आपण किती आहोत हे दाखवावे लागते.
त्या दिवशी आमचे सहपरिवार अमृतसर येथील " सुवर्ण मंदिर " पाहून पुढील कार्यक्रम हा हिंदुस्तान आणि पाकिस्तान यांची संध्याकालची राष्ट्रध्वजाची मानवंदना याचा कार्यक्रम पाहण्यास गेलो होतो. आमच्या सर्व परिवाराची चुकामुक झाली.पण तो पर्यंत तेथील BSF ( सीमा सुरक्षा जवान ) यांनी शांत बसण्यास सांगितले. थोड्या वेळात मानवंदना कार्यक्रम सुरु होणार त्या आधी आपला राष्ट्रीय ध्वज '' तिरंगा " घेऊन काही लहान मुलांना त्या पथावरून आनंदाने आणि जल्लोषाने नाचत आपला तिरंगा खाली न पडता धावत जाण्यास सांगितले.
आमच्या परिवारातील काही लहान मुलांनी आपला राष्ट्रीय ध्वज नाचत आणि आनंदाने न पडता नेला तो सुद्धा पाकिस्तानच्या सीमा रेषा जवळून त्या नंतर तेथील एक सीमा अधिका-याने ध्वनी उत्सर्जित संचावरून बसलेल्या सर्व हिंदुस्तानी नागरिकांना एक आवाहन केले कि , फक्त ३ घोषण मर्यादित आहे.
१. वंदे मातरम्
२. भारत माता कि जय
३. हिंदुस्तान झिंदाबाद
या शिवाय कोणत्याही घोषण देऊ नये असे सक्त ताकीद सुद्धा केली होती. त्या प्रमाणे आपल्या नागरिकांनी त्या सूचनांना दाद सुद्धा दिली. त्या नंतर सर्व कार्यक्रम त्यांच्या पाकिस्तानी घोषणांनी आणि आपल्या हिंदुस्तानी घोषणांनी झाला. हा कार्यक्रम ६.३० वाजता संपूर्ण झाला त्या नंतर आपले हिंदुस्तानी नागरिक पण त्या दिव्य भवनातून बाहेर पडले. पण त्या आधी काही जणांनी प्लास्टिकचे " तिरंगा " घेतले होते. आणि ते जाताना घाई गडबडीत पडून गेले.
तेव्हा आम्ही तेथून जात असताना ते सर्व प्लास्टिकचे ध्वज पडलेले होते तेव्हा मी आणि माझ्या आई ने ध्वज उचलून माझ्याकडे दिले.तेव्हा मी ते सर्व ध्वज BSF ( सीमा सुरक्षा जवान ) आणि स्थानीय सीमा सुरक्षा पोलीस यांच्या कडे गेलो आणि एक प्रश्न उपस्तिथ केला तो पण हिंदी मधून
" सरजी ये तो अपनी हिंदुस्तान कि शान ओर जान है l इस के लिए तो नजाने कितनोने अपनी जान की बाजी लगा दी और आप यहा पे तैनात होके भी अपने इस हिंदुस्तान की शान का क्यों निचा दिखा रहे हो ........? "
त्या वर दिलेले मला उत्तर
" इस में हम क्या करे ..........? "
मी तर माझ्या आई बरोबर ते प्लास्टिकचे ध्वज उचलून बाहेरचा रस्ता पकडला आणि जाताना त्या प्लास्टिकचे ध्वज विकणारे त्यांना सुद्धा मनातून सुद्धा शिव्या घातल्या.
त्यामुळे ते पडलेले आपले राष्ट्रीयध्वज मी ते उचलून आमच्या राहत्या हॉटेल जवळ ठेवेले.

No comments:
Post a Comment