Saturday 9 June 2012



।। स्वस्ति श्री ।।

शिवकार्य असे ही

दुर्गवीर प्रतिष्टान श्रमदानासहीत सामाजिक बांधिलकीचे कार्य करत आहे.हीच बांधिलकी जपण्यासाठी शिवदुर्ग सुरगड़ (नागोठणे) येथील पाडयातील विद्यार्ध्यानां शालेय वस्तूंचे साहित्य संच देण्यात येणार आहे....

प्रत्येक विद्यार्थीस शालेय वस्तूंचे साहित्य संच खालील प्रमाणे वस्तु देण्यात येणार आहे......

१) दप्तर २) मोठी वही ९ नग
३) पेन्सिल संच ४) रंगीत खडू (चित्रकला)
५) कंपास पेटी

या सोबत छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ साहेब व शंभुराराजांच्या जीवनावरील पुस्तके भेट देण्याचा सुद्धा मानस आहे.

ज्या शिवभक्तांना पुस्तके भेट द्यावयाचे आहेत ,परंतु प्रत्यक्ष मोहीमेला उपस्थित राहता येणार नाही. त्यांनी लवकारात लवकर संपर्क साधावा.

सदर मोहिमेस आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.

शिवकृपेने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने या शिवकार्यात यश लाभेल हे निश्चितच.

सर्व शिवशंभू भक्तांनी (दिवा) स्थानका येथे १० जून २०१२ रोजी सकाळी ठीक ६.०० वाजता जमावे.

शालेय वस्तुचे वाटप करुन झाल्यावर ,सुरगडाचे(गडदर्शन) दर्शन घेवुन दुपार पर्यत मोहिमेची सांगता घेवुया .

आणिक म्हणे उचलु वाटा खारीचा,
तोला नि मोलाचा,
मनात ध्यास शिवबाचा,
अन शिवबाच्या कार्याचा.

आमचे संपर्क :
नि३ पाटोळे ८६५५८२३७४८
अजित राणे ९७६८३८९१८९


ll जय शिवराय ll
ll जय शिवसाई ll

No comments:

Post a Comment