Friday 8 June 2012



शिवशंभूच्यां जटा मध्ये सदा वसे गंगा सागर अन् चंद्रकोर थोर 

परम प्रतापी शिवरायांच्या मस्तकी शोभे "चंद्रकोर".............



“आपण चंद्रकोर का लावतो” .........?

हा प्रश्न मी माझ्या मनाला विचारलं तर उत्तर मला मिळेनासे झाले पण महाराजांच्या मस्तकी दोन नेत्रांच्या मध्य स्तिथी "चंद्रकोर" लावत असे मी अनेक महाराजांच्या छायाचित्रात बघितले आहे.तर हा प्रश्न थोडा मनाला  भेडसावणारा आहे कारण आपण आपले पूर्वज हे "चंद्रगुप्त मौर्य" यांच्या पासून आलेला आहे. मग  मी माझ्या काही मित्रांना विचारले असता. आपण चंद्र कोर का लावतो .........?   त्यांनी उत्तर दिले कि "आपण चंद्र वंशी आहोत "हे माझ्या मनाला न  पटणारे आहे.  कारण, फार वर्षांपूर्वी राजस्थानच्या चितोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ "भोसाजी"महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले.

त्यानंतर काही प्रश्न माझ्या ध्यानी आले..........      
  •  राजपुतांचा कारकिर्दीतला अभ्यास केला तर राजपूत हे "सूर्यवंशी" हे नक्की आणि त्यांची ख्याती हि राजस्थान आणि संपूर्ण हिंदूराष्ट्रात सुद्धा त्यांच्या किल्यांवर सुद्धा दिसून येते. मग  आपण 'चंद्रवंशी" कश्यावरून ...........?     
  •  आपण "चंद्रवंशी" कश्यावरून जरा हिंदू  धार्मिक द्रुष्टीकोनातून आपण बघितले तर हिंदु धर्माची दिवसाची सुरुवात हि "सूर्योदय" आणि दिवसाचा शेवट हा "सूर्यास्त" असा होतो. म्हणजे आपण ''चंद्रवंशी" कश्यावरून.........?   
  •  मुळात इस्लाम धर्मीय मनुष्य हे "चंद्र" याला त्यांच्या धार्मिक द्रूष्टीकोनातून पवित्र मानतात  तर ते "चंद्र" याची उपासक  मग आपण का आपल्या मस्तकी "चंद्रकोर' लावतो..........?     
  •  चंद्र म्हणजे शांत आणि सौम्य याचे प्रतिक म्हणून मग तरी सुद्धा इस्लाम धर्मीय "चंद्र” उपासक का आहे……….? आणि आपण हिंदू धर्मीय "सूर्याचे" उपासक मग  आपण 'चंद्रवंशी" कश्यावरून ...........?     
  •  काही इतिहासकारांच्या मते परम प्रतापी शिवाजी महाराज हे "चंद्रकोर" लावताच नव्हते ..........?    
  •  काही इतिहासकारांच्या मते परम प्रतापी शंभाजी महाराज हे त्यांच्या मस्तकी दोन नेत्रांच्या मध्यभागी "त्रिस्तंभ" लावत असे. मग शिवराय महाराज हे "चंद्रकोर" कश्यावरून लावत असे ............?
माझे "चंद्रकोर" लावण्याबाबत काहीच विरोध आणि विशिष्ठ संकल्पना सुद्धा नाही. पण जेव्हा आपण आपल्या दोन नेत्रांच्या मध्ये "चंद्रकोर" लावतो तेव्हा ते आपल्याला शिवभक्त बोलतात काही जन मस्करी सुद्धा करत असतात.    
पण आपल्या मनावर एक "चंद्रकोर" लावण्याने एक अलौकिक शिवरायांची आराधना अंगी नेतृत्व करते.

आपले शिवराय नीतिवंत, कुलवंत, सामर्थ्यवंत, वक्तशीरपणा, चलाखीपणा, दूरदृष्टीता आणि इतर धर्मियांना सुद्धा आदराने वागवणूक देणारे  असे होते मग आपल्याला सुद्धा आपल्या राहतो त्या परिसरात शिवरायांचे काही गुण अंगी स्वीकार करून समाजात असे वागवणूक आपल्या हिंदू बांधवाना दिले पाहिजे. 
शिवरायांनी आणि शंभाजी महाराजांनी जो हिंदू धर्म जोपासला आहे तो आपण सर्वां पुढे दाखवावा. हि विनंती ...

ll जय शिवराय ll   
ll जय शंभूराजे ll  

No comments:

Post a Comment