Tuesday 19 June 2012

दुर्गवीर प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी "किल्ले मानगड" श्रमदान मोहीम राबविली.












१७/०६/२०१२ या राजमाता जिजाऊ पुण्यदिन निमित्त "दुर्गवीर प्रतिष्ठान" च्या वतीने राबविण्यात आलले दुर्ग संवर्धन मोहिमे अंतर्गत "किल्ले मानगड" वरील मुख्य प्रवेशदरवाजातील मांडणी आणि एका जुन्या दरवाजातील उत्खनन श्रमदान राबविण्यात आलेले आहे.

ज्या मानगडाची साफ - सफाई न करण्यात आल्याने "किल्ले मानगड'' ठिकठिकाणी अस्वच्छता झाली होती. ती सुद्धा दुर्गवीरच्या कार्यकर्त्यांनी साफ सफाई करण्यात आली. मुख्य म्हणजे मानगडाच्या शेवटच्या बुरुजावरील २५० ते ३०० वर्षापूर्वीचा दरवाजा सुद्धा उत्खनन करून तो संपूर्णपणे ६ ते ७ शिवकाळातील पायऱ्या दिसतील अश्या अवस्थेत ते श्रमदान करण्यात आले.

त्या दरवाजावरील मातीचा ढिगारा आणि दगड काढण्यात आले. या पुढे त्या गडाला भेट देणाऱ्या शिवभक्तांना त्या शिवकाळातील तो दरवाजा आता संपूर्णपणे बघू शकतो अश्या पद्धतीने श्रमदान करण्यात आले.

दुर्गवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष कु. संतोष हसुरकर, संपर्कप्रमुख - श्री. अजित राणे आणि सहसंपर्क प्रमुख - कु. नितीन पाटोळे आणि मुख्य म्हणजे ६ तरुणी आणि ३६ तरुण असा दुर्गवीर परिवारातील मावळ्यांनी हे श्रमदानाचे संयोजन राबविण्यात आले.

गडाच्या पायथ्याशी असलेले मानवाडी उर्फ (माशिदवाडी) येथील ग्रामस्थ "रामजी कदम" यांनी सुद्धा दुर्गवीरच्या सर्व मावळ्यांना आपल्या परिवारातील एक घटक समजून जी मदत केली ती त्या मदतीला शब्द सुद्धा कमी पडतील असे आहे.

(सोबत)- श्रमदाना सोबत गडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यात गरीब मूलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. सदर मोहिमेत मुंबई सोबत पुण्याच्या दुर्गवीरांनी सुद्धा विशेष मेहनत घेतली.

सेवे ठायी तत्पर ...दुर्गवीर निरंतर ...

दुर्गवीर प्रतिष्ठान
एक छोटासा कार्यकर्ता

(चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे)

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
ll जय शंभूराजे ll

ll अखंड हिंदूराष्ट्र भवः ll
 

No comments:

Post a Comment